pune News : गणेशमूर्तींची खरेदी ऑनलाईन करा – महापौर 

एमपीसी न्यूज – पुणे शहरात यावर्षी गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मनपा रस्ता, पदपथावर परवानग्या दिल्या गेलेल्या नाहीत. गणेशमूर्ती विक्री परवानग्या केवळ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर दिली गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि मंडळांनी गणेशमुर्तींची खरेदी ऑनलाईन पध्दतीन करावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. 

गणेशमूतीर्ची विक्रीच्या परवानग्या मनपाच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून देण्याचे नियोजन केले जात आहे. उत्सव कालावधीत रस्ता आणि पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अधिकृत परवानगी यावर्षी दिली जाणा नाही.

अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायास पूर्णपणे प्रतिबंध केला जाणार असल्याचेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. यावर्षी कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट पुणे शहरात निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका अनेक उपाययोजना करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.