Pune News : पुणे महापालिकेच्या 2 जागेसाठी होणार पोटनिवडणूक !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या दोन रिक्‍त नगरसेवकांच्या जागांसाठीचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

त्यानुसार, ही पोटनिवडणूक येत्या एप्रिलमध्ये होण्याची शक्‍यता आहे. भाजपचे नगरसेवक महेश लडकत आणि विजय शेवाळे यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या प्रभाग क्रमांक 8 क आणि 29 ब या दोन जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, अवघ्या वर्षभरावर पालिका निवडणूक येऊन ठेपल्याने पाच ते सहा महिन्यांसाठीच हे पद असणार आहे.

राज्यातील 16 महापालिकांमधील विविध कारणांमुळे रिक्‍त झालेल्या नगरसेवकपदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. पुण्यातील या दोन्ही जागा सत्ताधारी भाजपच्या आहेत. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर या निवडणुका होणार असल्याने तसेच महापालिका निवडणुकीपूर्वी त्या होत असल्याने भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात या दोन्ही जागांसाठी चुरस असणार आहे. त्यामुळे, या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंनी तयारी सुरू करण्यात आली असून त्याबाबत प्राथमिक बैठकाही झालेल्या आहेत.

असा असेल मतदार यादी कार्यक्रम…..

* 16 फेब्रुवारीपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे

* 16 ते 23 या कालावधीत त्यावर हरकती सूचना मागविणे

* 3 मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे

* 8 मार्चला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करणे

* 12 मार्चला अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.