Pune News : रस्त्याच्या मधोमध दुचाकी उभी करून वाहतूक पोलिसास धक्काबुक्की, आरोपी अटकेत

0

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या मधोमध दुचाकी उभी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून लोकांना शिवीगाळ केली. तसेच, वाहतूक पोलिसास धक्काबुक्की करणाऱ्या 24 वर्षीय इसमाला अटक केली आहे. कोंढवा स्मशानभूमी जवळ मंगळवारी (दि.08) दुपारी तीन वाजता ही घटना घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुरज विजय घोडके (वय 24, रा. काळेवाडी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक पोलीस हवालदार कुंडलिक गवळी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज घोडके हा रस्त्याच्या मधोमध दुचाकी उभी करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून लोकांना शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादी वाहतूक पोलीस यांनी तरूणाला दुचाकी बाजूला घ्यायला लावली पण, आरोपीने फिर्यादी यांना धक्का बुक्की करत अपशब्द वापरला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment