Pune News : कोरोनावरील उपचारासाठी शहरात आर्मीच्या आरोग्य विभागाला पाचारण करा – काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारी हॉस्पिटलमध्ये सुसंगतपणा येण्यासाठी पुणे शहरातील पूर्ण कोरोनावरील उपचाराची यंत्रणा आर्मी हॉस्पिटलच्या स्वाधीन करा, असे पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तसेच पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर दिले जाणारे उपचार याच्यामध्ये खूपच ढिसाळपणा असून खासगी व सरकारी उपचाराची पद्धतीत कोठेही एकसारखेपणा दिसत नाही. सरकारी हॉस्पिटलमध्ये केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या अध्यादेशप्रमाणे औषधे दिली जातात. त्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही औषधे कोरोना रुग्णांना देण्यात येत नाहीत. रुग्णांना असणारे क्रॉनिक आजारावरील फाईल टेबलवर तशीच पडून राहते परंतु डॉक्टर किंवा नर्सेसकडून त्या रुग्णांना ती औषधे दिली जात नाही. व स्वतःहून औषधे स्वतः घेता येत नाहीत. जरी त्याच्या क्रॉनिक आजारावरील औषधे नातेवाईकांनी आणून दिली तरी डॉक्टर किंवा नर्सेस कडून त्यांना औषधे दिली जात नाहीत. ही अतिशय चिंतेची बाब असून त्यामुळे नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटल पेक्षा सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्ण जास्त दगावतात ही वस्तुस्थिती समोर येत आहे. तसेच खासगी हॉस्पिटलप्रमाणे सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील कोरोनावरील ऍडव्हान्स औषधे व रुग्णांच्या क्रोनिक आजारांवरील औषधे देण्यात यावीत. व प्रत्येक रुग्णांची वेगवेगळी परिस्थिती प्रमाणे त्यांचेवर उपचार करण्यात यावेत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

बागूल म्हणाले की, पुणे शहरात कोरोना रुग्ण कमी आढळत आहे, असे येणाऱ्या रिपोर्ट वरून कळते, परंतु काही दिवसांपासून शहरात कोरोना टेस्ट कमी केल्यामुळे हा आकडा कमी येत आहे. टेस्ट कमी करून देखील पुण्यामध्ये चार ते पाच हजार रुग्ण दररोज मिळत आहे. ही पुणे शहराच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब आहे. नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये. यासाठी लॉकडाउन करण्यात आले परंतु लॉक उनचे तंतोतंत पालन होत नाही, कोणाचे कोणावर नियंत्रण नाही.

या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन दिल्लीप्रमाणे पुण्यातही आर्मी हॉस्पिटलकडे कोरोनाची आरोग्यव्यवस्था सोपविण्याची वेळ आली आहे. यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारशी त्वरित संपर्क साधून आर्मीच्या आरोग्य विभागाला पुण्यामध्ये पाचारण करावे व शहराची संपूर्ण आरोग्य व्यवस्था त्यांच्या ताब्यात द्यावी अन्यथा महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. एकदा का ही परिस्थिती हाताबाहेर गेली तर परत आटोक्यात आणणे अशक्य होईल. नागरिकांच्या जिवाशी त्यामुळे खेळ होत असून सर्व राजकारण बाजूला ठेवून पुणेकारांसाठी आर्मीच्या आरोग्य विभागाला पाचारण करावे,  असे आबा बागुल शेवटी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.