Pune News : विरोधातील अनेकांनी काय थोडी लपवाछपवी केली ते सांगू का?: अजित पवार 

एमपीसी न्यूज : धनंजय मुंडे साहेबांना जे काही सांगायचे होते. ते त्यांनी सांगितले आहे. मग जर रेकॉर्ड पाहायचे झालं तर अनेकांनी काय काय थोडी लपवाछपवी केली. ते सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना, कोणाला किती मुलं होती आणि कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाचं लग्न झालं नव्हतं. तर झालं होत तर कोण होतं, अशा बर्‍याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता, अशा शब्दात विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडे बोल सुनावले.

पुणे विधानभवनात (कौन्सिल हॉल) येथे विविध विषयांवरील आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

धनंजय मुंडे यांच्यावरील लैंगिक अत्याचार आरोप प्रकरणी संबधित महिलेने तक्रार मागे घेतली. आम्हाला असाच निर्णय अपेक्षित होता. तसेच मुलांची माहिती देखील मुंडे यांनी लपविली आहे या प्रश्नावर पवार म्हणाले, आता विरोधकांना काय म्हणावं एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर देत लोकांची दिशाभूल करायची. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.