Pune News : बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचा कँडल मार्च

एमपीसी न्यूज – नोकर भरतीच्या विविध मागण्यांसाठी मागण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.23) कँडल मार्च काढला ( Pune News ) होता. या कँडल मार्चमध्ये 200 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी क्लार्क, ऑफिसर्स, सब-स्टाफ, अर्धवेळ सब-स्टाफची भरती करा, प्रशासकीय बदल्यांचे मनमानी व दडपशाहीचे धोरण बंद करा, ग्राहकांच्या, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, कामगार संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न थांबवा, अशा विविध मागण्या शांततेच्या मार्गाने मांडण्यात आल्या.

Pune Crime News : पुण्यात दोन हुक्का पार्लरवर छापा

युनायटेड फोरम फॉर महाबँक युनियनच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ग्राउंडजवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल ऑफिसपासून ते मुख्य कार्यालयाजवळील एकबोटे कॉलनीतील पोस्ट ऑफिसपर्यंत हा कँडल मार्च निघाला. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना आणि महाबँक नवनिर्माण सेना आदी कर्मचारी संघटना यात ( Pune News ) सहभागी झाल्या.

संघटनांचे प्रतिनिधी धनंजय कुलकर्णी, शैलेश टिळेकर, अनंत सावंत, राजीव ताम्हाणे, बी. कृष्णा, संतोष गदादे, विराज टिकेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निघालेल्या या कँडल मार्च द्वारे लवकरात लवकर नोकरीभरती करावी, अशी मागणी करण्यात आली.

शैलेश टिळेकर म्हणाले, या मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या आधी निवेदन, ट्विटर मोर्चा काढला आहे. आज येथे कँडल मार्च काढला असून, याची दखल घेतली नाही, तर येत्या काळात तीव्र आंदोलन करणार आहोत. बदलीचे मनमानी धोरण राबवले जात असून, कर्मचारी संघटनांना विश्वासात न घेता निर्णय घेऊन ते लादले जात आहेत. या सगळ्या विरोधात आणि असंवेदनशील बँक व्यवस्थापनाला जागे करण्यासाठी ( Pune News ) सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट झाली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.