Pune News : पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे मोदी सरकारच्या निषेधार्त मंडईमध्ये गाजर वाटप आंदोलन

एमपीसी न्यूज : शारदा गणपती मंदिर मंडई येथे गाजर वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व नागरिकांना प्रसाद म्हणून गाजर वाटप करण्यात आले.

सध्या सामान्य जनतेवर मोदी साहेबांच्या सरकारने जे अतोनात हाल चालवले आहे व कालच्या अर्थसंकल्पामध्ये तरुणांसाठी खऱ्या अर्थाने गाजर देण्यात आले, त्यासाठी या मोदी सरकारला सद्बुद्धी द्या, अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करण्यात आली व तेथील सर्व नागरिकांना प्रसाद म्हणून गाजर वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे शहर युवक अध्यक्ष विशाल मलके, शहर व्यापारी अध्यक्ष बाळासाहेब अमराळे, कसबा ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, युवक ब्लॉक अध्यक्ष ऋषिकेश वीरकर, प्राजक्ता कलमानी, महासचिव कुणाल काळे, निलेश सांगळे, संकेत गलांडे, ऋषी सणस, अक्षय परदेशी, राहुल ढमाले, अक्षय माने, धनराज माने, राहुल लांडे, शिवराज मात्रे, अक्षय नवगिरे, ऋतुराज कोंढरे, अक्षय सागर, मयूर परदेशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे व महासचिव विवेक कडू यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.