Pune News :राजे शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने सिंहगडावर दिवाळी पाडवा साजरा

एमपीसीन्यूज : एक तरी सण   किल्ल्यावर जाऊन साजरा केला पाहिजे. थोडा वेळ आपले वर्तमान आयुष्य विसरून भुतकाळातील परंपरांना उजाळा दिला पाहिजे…असा निर्धार करुन राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले सिंहगडावर दिवाळी पाडवा उत्सव साजरा जल्लोषात करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने गेली 12 वर्षे गडकोटांवर दिवाळी पाडवा साजरा केला जातो.

याही वर्षी किल्ले सिंहगडावर अतिशय उत्साहात गडपूजन सोहळा संपन्न झाला. सर्व कार्यकर्त्यांनी किल्ले सिंहगडावरील पुणे दरवाजाला मांगल्याचे प्रतिक असलेले तोरण लावले. या कार्यक्रमासाठी प्रतापगड उत्सव समितीचे संजय  भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गडपूजन व गडावरील विविध मंदिरांची पूजा करण्यात आली.

नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासमोर शिववंदना घेण्यात आली. संजय भोसले यांनी इतिहासातील घटनांना उजाळा देऊन पाडव्याचे महत्व सांगितले. त्याच प्रमाणे राजे शिवराय प्रतिष्ठानचे हे शिवकार्य सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजाला दिशा देणारे ठरेल, असे गौरवोद्गारही काढले.

_MPC_DIR_MPU_II

प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी किल्ले सिंहगडाच्या पावित्र्य रक्षणासाठी सर्वांनी नेहमी सज्ज राहावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक शिवाजी खरात यांनी केले. विक्रम बर्गे यांच्या समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिष्ठानचे पुणे शहर समन्वयक अमित जाधव, रणजीत टेमघरे, महेश रांजणे, विवेक अंडिल, हर्षल तापकीर, शुभम चांदेरे, सागर काळोखे, स्वप्नील महाडिक, अक्षय जाधव, उमेश शिगवण, सनी येळवंडे, सिद्धेश काप, पशुपती हिंगमिरे, स्वप्नील भोसले यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.