Pune News : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी घरीच साजरी करा; पुणे पोलिसांचे आवाहन

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती रविवार (दि.01, ऑगस्ट ) रोजी साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी घरीच साजरी करावी. असे आवाहन पुणे शहर पोलीस आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शताब्दी जयंती महोत्सव समिती यांनी केले आहे.

पुणे पोलिसांच्या वतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मिक प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत तसेच, जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे नागरिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घरातच साजरी करावी आसे आवाहन करण्यात आले आहे.

सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मोजक्याज लोकांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. त्यामुळे याठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.