Pune News : ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी माफी मागावी – डॉ नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज – महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी देशातील सर्व राज्य कडक कायदे करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत छत्तीसगडच्या महिला आयोग्याच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलेल्या, ‘ब्रेकअप झाल्यानंतर मुलींकडून बलात्काराचे आरोप केले जातात’ असे वक्तव्ये केले होते त्याचा आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चांगलाच समाचार घेतला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनेक गुन्ह्यात अपहरण करून बलात्कार केले जातात, अल्पवयीन मुली असतात त्यांना फूस लावून पळवून नेले जाते आणि त्याच्यावर बलात्कार केले जातात. ज्याप्रमाणे हाथरसच्या केसमध्ये झाले की, आरोपीच्या वकिलांकडून पीडित लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती किंवा ऑनर किलिंगचा आरोप केले जातो जेणेकरून बलात्काराच्या आरोपींना सुटणे सोपे व्हावे.

छत्तीसगडच्या महिला अध्यक्षाने केले विधान निषेधार्थ आहे. श्रीमती नायक यांनी केलेले वक्तव्ये हे बलात्कारातील आरोपींना संरक्षण देणारे आहे. न्यायालयाने श्रीमती नायक यांच्या वक्तव्याची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.