_MPC_DIR_MPU_III

Weather News : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह त्याचबरोबर महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : कानकोन, पणजी (गोवा) 8 प्रत्येकी, मार्मगोवा, शहापूर 6 प्रत्येकी, खेड, मालवण 5 प्रत्येकी, अलिबाग, दाभोलीम (गोवा), गुहागर, कर्जत, म्हसळा, पेडणे, रोहा, वाडा 3 प्रत्येकी, चिपळूण, हरनाई, महाड , मंडणगड, माणगांव, पोलादपूर, केपे, वैभववाडी 2 प्रत्येकी, भिरा, कणकवली, मडगाव, माथेरान, मुंबई (कुलाबा), मुरुड, पालघर, सांगे, श्रीवर्धन, ठाणे, उरण, वेंगुर्ला, विक्रमगड 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: नेवासा 10, शेवगाव 7, अक्कलकुवा, पंढरपूर 6 प्रत्येकी, आटपाडी, चांदवड, मंगळवेढा 5, गगनबावडा 4, जाट, शहादा 3 प्रत्येकी, अकोले, बारामती, दहिवडी माण, जामखेड, खटाव वडूज, माधा, माळशिरस, नंदुरबार, पाथर्डी, रहाटा 2 प्रत्येकी, चाळीसगाव, गिरना धरण, कडेगाव, कोपरगाव, मोहोळ, नांदगाव, निफाड, ओझरखेडा, पारनेर, संगमनेर, सांगोला, श्रीरामपूर,
विटा 1 प्रत्येकी.

मराठवाडा: पूर्णा 14, मनवत 10, पाथरी 8, बिलोली, तुळजापूर 7 प्रत्येकी, धर्मबाद 6, अर्धापूर, मुदखेड, शिरुर अनंतपाल 5 प्रत्येकी, गंगापूर, पालम, वसमत 4 प्रत्येकी, डग्लूर, देवणी, गेवराई, जिंतूर, सेलू, उमरगा 3 प्रत्येकी, औरंगाबाद, औसा, लोहारा, माजलगाव, नायगाव खैरगाव, परभणी, उमारी 2 प्रत्येकी, धारूर, गंगाखेड, घनसावंगी, हदगाव, मुखेड, पैठण, परळी वैजनाथ, सोनपेठ, वैजापूर 1 प्रत्येकी.

विदर्भ: गोरेगाव 3, आमगाव, अर्जुनी मोरगाव 2 प्रत्येकी, अकोट, देवरी, साकोली 1 प्रत्येकी.

घाटमाथा: अम्बोणे,3, लोणावळा (ऑफिस), लोणावळा (टाटा), डुंगरवाडी, ताम्हिणी 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

_MPC_DIR_MPU_II

18-19 सप्टेंबर : कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

20-21 सप्टेंबर : कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

22 सप्टेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

19 सप्टेंबर : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

20 सप्टेंबर : दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

21 सप्टेंबर: दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

22 सप्टेंबर : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.