Pune News : पुण्यातील चांदणी चौकाजवळ बसला भीषण आग

एमपीसी न्यूज : पुण्यातून आगीच्या घटनेचं वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील कोथरूड, चांदणी चौकाच्या पुढे एका बसला आग लागल्याची घटना घडली आहे.(Pune News) या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 2 वाहने रवाना झाली . अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत ही आग विझविण्यात आली असून यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

कोथरूडजवळील चांदणी चौकाच्या पुढे बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीच वृत्त मिळताच अग्निशमन दलाची 2 वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बसला लागलेली आग विझविण्यात आलेली आहे. मारणेवाडीच्या बसला आग लागल्याने रस्त्यावर एकच खळबळ उडाली. बस आग लागल्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे जीव वाचले. या आगीमुळे चांदणी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

Pimpri News : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून मोशी येथील प्रस्तावित न्यायालयाच्या जागेची पाहणी

याबाबत माहिती देताना, निलेश महाजन, अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग, पुणे महानगरपालिका यांनी सांगितली कि, भुगावला जाणाऱ्या पीएमपीएमएल बसला चांदणी चौका जवळ आग लागली. बस चालकाला इंजिन मधून धूर येताना दिसल्याने त्याने बस चौकाच्या पुढे गेल्यावर थांबवली. त्यानंतर चालक व वाहकाने  बसमधील 30 ते 35 प्रवाशांना बाहेर काढले. चालकाने बस मधील फायर एक्सटिंगविशरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

एका नागरिकाने अग्निशमन विभागाला आगीबाबत कळविले होते. त्यामुळे घटनास्थळी वारजे व कोथरूड अग्निशमन केंद्रांचे प्रत्येकी एक अग्निशमन बंब पोहचले होते. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी काही वेळातच आग विझवली.

त्यातील एका प्रवाश्याने या घटनेची माहीती मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला दिली असता तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बलकवडे सह टिम घटनास्थळी पोचली या वेळी कोथरूड अग्निशामक दल आणि वारजे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवरती नियंत्रण मिळवण्या साठी त्यांनी अथक प्रयत्न करत असताना जवानाना आग विझवण्यात यश आले.

यावेळी बावधन पोलीस चौकीचे पी एस आए साळूंके हवलदार विजय गायकवाड, व्हायाळ, सुनील जाधव, तसेच जवळच असणारे ट्राफिक पोलीस यांनी घटनास्थळा जवळ जमालेल्या आणि प्रवाश्याना लांब ठेवण्याचे विशेष प्रयत्न केले. कोथरूड फायर स्टेशन आणि वारजे फायर स्टेशन सचिन मांडवकर सो गजानन पाथरूडकर सो यांच्यासह बाबूराव शितकल, अमोल पवार, दिकप पाटिल, महेश शिळीमकर, सागर सोनवने, राजेंद्र पायगुडे, जयश लबडे, निलेश तागुंदे, रुपेश जांभळे, अतुल ढगळे, यांच्या अथक प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला, सर्व प्रवाशी सुखरूप असून बस चे मोठे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.