Pune News : मनसेने परप्रांतीयांबाबतची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मगच युतीची चर्चा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : जोपर्यंत परप्रांतीय लोकांबाबतची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्पष्ट करीत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासोबत युतीबाबत चर्चा होणार नाही. देशभरात मराठी माणसे राहतात त्यांना अशी वागणूक मिळत नाही. मनसेचा नेमका कशाला विरोध आहे हे कळत नसल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची कोणतीही चर्चा नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शहरातील विविध प्रश्नांबाबत पाटील यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेटून घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, मनसेसोबत भाजपाची युती संदर्भात दोन्ही पक्षांच्या पातळीवर कोणतीही चर्चा नाही. आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये युती करण्यापुर्वी परराज्यातून आलेल्या परप्रांतीयांबद्दलची भुमिका मनसे स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.