Pune News : चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी : अजित पवार

0

एमपीसी न्यूज : राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काल एका मेळाव्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनाश काले विपरीत बुद्धी म्हणावं लागेल, अशा शब्दात जोरदार टीका केली.

अजित पवार पुढे म्हणाले, ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी, ज्या पवार साहेबांनी समाज आणि राजकारणात 60 वर्ष काम केले आहे. महाराष्ट्राची जाण असणारे नेते आहेत. दिल्लीमध्ये ज्यांच्या शब्दाला वजन आहे. ते सर्वांनी पाहिले आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सारख्याला पवार साहेब बद्दलचे विधान शोभत नाही.

एकेकाळी साहेबांबदल काय विधान केले आहे. हे सर्वांना आठवत असेल, त्यामुळे त्यांचे आजचे विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी म्हणाव लागेल, हे तर सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III