Pune News : पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – चतुःश्रृंगी वाहतूक विभाग अंतर्गत (Pune News) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक व परिसरामध्ये मेट्रोच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने वाहतूक पोलिस व पीएमआरडीए मेट्रो विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आजूबाजूच्या परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता व इतर प्रभावित रस्त्यावरील वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत, हे बदल आजपासून (बुधवार) लागू होणार आहेत. हा बदल प्रायोगिक तत्वावर असणार आहे.

वाहतूक बदल खालीलप्रमाणे असतील – 

1) बाणेर रोड व पौड रोडने विद्यापीठ चौकात येणारी वाहने ही बिना सिग्नल शिवाजीनगरकडे डाव्या लेनने जातील. तसेच विद्यापीठ चौक येथे पादचा-यांना रस्ता ओलांडणेकरीता वेळ देण्यात येत आहे.
2) गणेशखिंड रोड ने सेनापती बापट रोड कडे जाण्याकरीता यापूर्वी (Pune News) कॉसमॉस बँक येथे यु टर्न देण्यात आला होता. हा यु-टर्न बंद करुन सेनापती बापट रोड जंक्शन येथून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
3) सेनापती बापट रोडने (चतु:श्रृंगी मंदिर) येथून विद्यापीठ चौकाकडे येणारी सर्व वाहतूक सेनापती बापट रोड जंक्शन येथून डावीकडे वळून सरळ पाषाण रोडकडे वळविण्यात येत आहे.

4) गणेशखिंड रोडने विद्यापीठ चौकातून आौंधकडे जाण्यासाठी खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करता येईल.
पर्यायी वर्तुळाकार मार्ग – गणेशखिंड रोडकडून व सेनापती बापट रोडकडून पुणे विद्यापीठ, चतुःश्रृंगी पोलीस ठाणे, केंद्रीय विद्यालय, कस्तुरबा गांधी वसाहतकडे जाणा-या वाहनांकरीता पाषाण रोडने सिंहगड गेट (पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय) येथून उजवीकडे वळून बाणेर रोसने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जाता येईल.

किंवा पर्यायी वर्तुल्यकार मार्ग : पाषाण रोडने अभिमानश्री सोसायटी. पाषाण रोड जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसा. बाणेर रोड जंक्शन उजवीकडे बलून बाणेर रोडने उजवीकडे वळून सरळ (Pune News) विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंध कडे जाता येईल.

किंवा पर्यायी मार्ग : गणेशखिंड रोडकडून व सेनापती बापट रोडकडून औंधकडे जाणा-या वाहनांकरीता पाषाण रोडने अभिमानश्री सोसा, पाषाण रोड जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी. बाणेर रोड जंक्शन डावीकडे वळून बाणेर फाटा, उजवीकडे वळून सर्जा हॉटेल कॉर्नर डावीकडे वळून क्रोमा मॉल रस्त्याने किंवा बाणेर फाटा उजवीकडे वळून आय.टी.आय. रोडने परिहार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

5) पिंपरी चिंचवड बाजुने राजीव गांधी पुलाकडून पुणे स्टेशनकडे जाणा-या व परत येणा-या नागरिकांसाठी पर्यायी मार्ग

पर्यायी मार्ग : राजीव गांधी ब्रिजकडुन खडकी, येरवडा, पुणे स्टेशन, लष्कर, कोरेगांव पार्क कडे जाणा-या वाहनांकरिता ब्रेमन चौकातून डावीकडे वळून स्पायसर कॉलेज रोड, आंबेडकर चौक, साई चौक, उजवीकडे वळून खडकी पोलीस स्टेशन, रेल्वे अंडरपास डावीकडे वळून चर्च चौक, जुना पुणे मुंबई महामार्गाचा वापर करता येईल.

PCMC : पाणीपट्टी आणि मिळकत कराचे एकत्रीकरण

पर्यायी मार्ग : पुणे स्टेशन, कोरेगांव पार्क, मुंढवाकडून औंधकडे येणा-या वाहनांकरिता इंजिनीअरींग कॉलेज उड्डाणपुलावरून वाकडेवाडी, पोल्ट्री फार्म चौक, चर्च चौक, डावीकडे वळून खड़की पोस्टे अंडरपास, डावीकडे वळून मरिआई मंदिर, उजवीकडे वळून गोगादेव चौक, उजवीकडे वळून जे टाईप (फुटबॉल ग्राउंड), उजवीकडे वळून साई चौक, सावीकडे वळून आंबेडकर चौक, स्पायसर चौक, ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.

वरील 1 ते 5 पर्यायी मार्ग हे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी वर नमुद पर्यायी व इतर मार्गाचा वापर करुन वाहतूक कोंडी टाळावी व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.