Pune News : बोपोडी चौक ते संविधान चौकातून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर बोपोडी चौक ते संविधान चौकातून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. याबाबत वाहतूक शाखेचे उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश काढले आहेत. हा वाहतूक बदल तात्पुरता असून आजपासून ( मंगळवार, दि. 16) पुढील 24 तासांसाठी राहणार आहे.

खालील प्रमाणे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

– संविधान चौक/ चर्च चौक ते खडकी बिजनेस सेंटर हा खडकीकडे जाणेस सैन्य व सैन्य दलाची वाहने वगळता एकेरी करण्यात आलेली आहे.

– बोपोडी चौकातुन पुणेकडे जाणारी वाहतुक डावीकडे वळवुन गुरुद्दारा साहेब, खडकी बाजार, खडकी बाजार बस स्टॅंड, अष्टविनायक मंदीर, सरळ वाकडेवाडी मुळारोडने जातील. खडकी बाजार मधील वाहन चालकांना खडकी रेल्वे स्टेशन, बोपोडी चौक व पिंपरीकडे जावयाचे असल्यास त्यांनी अष्टविनायक मंदीर चौकात येवुन उजवीकडे वळून सरळ म.गांधी रोडने खडकी रेल्वे स्टेशन, बोपोडी चौक व पिंपरी दिशेला जातील.

– बिजनेस सेटर चौकातुन होळकर ब्रिजकडे जाणारी वाहने एकमार्गी सरळ आयुध चौक,खडकी छावणी चौक,फुटबॉल ग्राउंड मार्गे बॉम्बे सॅपर्स, येरवडयाकडे जातील.  पुणेकडे जाणारी वाहने उजवीकडे वळुन छावनी परीषदमार्गे जुने मुंबई -पुणे रोडकडे जातील तसेच खडकी बाजाराकडुन नेहरु उदयान, फुटबॉल मैदानापासून मेथॉडिस्ट चर्चच्या पाठीमागून अर्जुनरोडवरुन एसबीआय खडकी शाखा मार्गे उस्मानरोड पुणे मुंबई रोडकडे जातील.

_MPC_DIR_MPU_II

– होळकर ब्रिज उड्डाणपुलावरुन खडकीकडे येणारी सर्व प्रकारची वाहने डावीकडे मुळारोडकडे वळुन मुळारोडने कॅपीटल स्टोन,पाचवड चौक,खडकी वॉर सिमेटरी, दास चौक/ अरगडे चौक, वाकडेवाडी मार्गे पुणे व मुंबई कडे जातील.

– जुना होळकर ब्रिजवरून येणारी व खडकीकडे जाणारी वाहने होळकर ब्रिज उड्डाणपुलाखालून उजवीकडे न वळता मुळारोड मार्गै जातील.

– नेहरु उदयान खडकी अँम्युनेशन फॅक्टरीकडून खडकी बाजाराकडे येणारी वाहने बिजनेस चौकाकडे न जाता डावीकडे वळून आयुध चौक,खडकी छावणी समोरुन पुणे व मुंबईकडे जातील.
– बोपोडी चौक ते खडकी बाजार बस स्टॅंड, अष्टविनायक मंदीर, बिजनेस सेंटर, आयुध चौक,खडकी छावणी चौक इथपर्यंतचा मार्ग एकेरी राहील. खडकी अगर बोपोडीकडे येण्यास बंदी राहील.

– आयुध चौकातुन उजवीकडे इ.एम.ई वर्कशॉप, गुरुद्दार, आरसनल लाईस, सीएएफव्हीडी कडे जाणारा रस्ता आयुध चौकातुन सर्व वाहतुकीस बंद राहील.तसेच ऑल सेंट हायस्कुल व चर्च चौक समोरुन आयुध चौकाकडे जाणारी वाहतुक वरील ठिकाणी बंद करण्यात येईल.

– बोपोडी चौकात सी.एम.ई.कडुन पुणेकडे येणारी लहान प्रकारची वाहने उदा .टेंम्पो, रिक्षा, कार, मो. सायकल इत्यादी हॅरीस ब्रिजवरुन आल्यावर डावीकडे वळुन हॅरीस ब्रिज खालुन भाऊ पाटील रोडने डॉ.बाबासहेब आंबेडकर चौकातुन डावीकडे वळुन औधरोड, साई चौक, रेल्वे पोलीस मुख्यालय मार्गे खडकी पोलीस स्टेशन जवळील अंडरपासमधुन चर्च चौकातुन पुणेकडे जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.