Pune News : छावा मराठा संघटनाही उतरणार पुणे पदवीधर निवडणुकीत

एमपीसी न्यूज – छावा मराठा संघटना पुणे पदवीधरची निवडणूक लढणार आहे. संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. ते उद्या (बुधवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पदवीधर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी जाधव गंभीर असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी छावा मराठा संघटने सोबतच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व पत्रकार उत्कर्ष समितीच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी येणाऱ्या अडचणी सोडवत आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी संघटनेने पुणे पदवीधर मतदार संघात उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पदवीधर मतदार नोंदणीसाठी आवाहन केले होते. त्याला पदवीधरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. यामुळे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपण स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III