_MPC_DIR_MPU_III

Pune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पुणे आयुक्तांकडून आढावा !

एमपीसी न्यूज : सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधून संपुर्ण घटना आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. राज्य यंत्रणेला समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला ही आग लागल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नाव प्लांट आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महापालिका आयुक्तांशी फोनवर संपर्क साधत आढावा घेतला.

दरम्यान पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेचा फोनवरुन आढावा घेतला. त्यांनी आग लवकरात लवकर विझविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरव राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून फोनवरुन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच इमारतीमध्ये अडकलेल्यांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटमध्ये 10 ते 12 अग्निशमन गाड्यांसह राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) तैनात झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटमधील ‘आर-बीसीजी’ लसीचे उत्पादन करणाऱ्या इमारतीमध्ये ही आग लागली आहे. कोरोनाच्या ‘कोव्हिशील्ड’ लस निर्मिती केंद्र त्यापासून काही किलोमीटर दूर आहे. कोरोनावरील ‘कोव्हिशील्ड’ या लसीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. जवळपास 1 कोटींहून जास्त लसींचे वितरण करण्यात आले आहे.

काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. तसेच महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोव्हिशील्ड ही लस पाठविण्यात आली होती. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपुर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते.

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लस निर्मिती केंद्र तसेच अन्य विविध प्रकारच्या लसींचे उत्पादन केले जाते. आग विझविण्याची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ब्रांटो या गाडीलाही तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रासह हडपसर, कोंढवा व अन्य केंद्राच्या गाड्या व जवान आग विझविण्याच्या प्रयत्नात आहेत.

आगीच्या ठिकाणी पोलिसही तत्काळ दाखल झाले असून तेथे जमा झालेल्या गर्दीला हटविण्याचे तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे काम हडपसर पोलिसांकडून केले जात आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.