Pune News : वाढदिवसापूर्वीच चिमुकलीवर काळाचा घाला; खेळताना गॅलरीतून पडून मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्याच्या नऱ्हे परिसरातील एका इमारतीच्या गॅलरीत खेळता असताना खाली पडल्याने एक वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अद्विका धरतेज गाथाडे असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील असणारे गाताडे कुटुंबीय नऱ्हे परिसरात वास्तव्यास आहे. धरतेज गाथाडे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ते अभिनव कॉलेजजवळील एका इमारतीत पाचव्या मजल्यावर राहतात.

बुधवारी अद्विकाचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे घरात त्याची तयारी सुरू होती. पहिल्या वाढदिवसाची तयारीही पूर्ण झाली होते.

_MPC_DIR_MPU_II

शेजार्‍यांना निमंत्रण देण्यासाठी आई त्यांच्या घरी गेली होती आणि वडील बाथरूममध्ये होते. यावेळी अद्विका घरात खेळत असताना ती नकळत बाल्कनीच्या दिशेने गेली आणि गॅलरीतून थेट खाली कोसळली.

शेजारी राहणार्‍यांना अद्विका खाली पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या चिमुरडीचा गुरुवारी दुपारच्या सुमारास मृत्यू झाला.

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.