Pune News : ‘सीआयडी’ची मोठी कारवाई, समृद्धी जीवनचे महेश मोतेवार यांच्या 5 अलिशान गाड्या जप्त

एमपीसी न्यूज – समृद्धी जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार यांच्या 5 अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) आर्थिक शाखेने ही कारवाई केली आहे. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये स्विफ्ट डिझायर, टाटा इंडिका, पजेरो, मिनी कुपर आणि निसान मायक्रा या गाड्यांचा समावेश आहे.

 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक शाखेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, समृध्द जीवन समूहाच्या कंपन्यांनी लाखो गुंतवणूकदार यांच्याकडून सुमारे 5,211 कोटी 69 लाख रुपये इतक्या ठेवी जमा केल्या असून, त्यापैकी 4,725 कोटी 64 लाख रूपये हून अधिक रकमेचा अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी समृध्द जीवन समूहाविरूध्द भारतातील 06 राज्यामध्ये एकूण 28 गुन्हे दाखल आहेत.

 

दरम्यान, काही दिवासांपूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने पुण्यातील इतर दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी विभागाच्या वतीने मोतेवार यांच्या अलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.