Pune News : पालिकेत नागरिकांना नियोजन वेळातच प्रवेश

एमपीसी न्यूज – शहरात कोरोना चा उद्रेक झाला आहे. त्यामुळे शासनाकडून कडक लॉकडाऊनचे आदेश काढतानाच शासकीय कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर विभागांच्या उपस्थितीवर बंधने घातली आहेत. असे असताना देखील महापालिकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत होती.त्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता पालिका प्रशासनाने याबाबत कडक उपयोजना करत गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे.

शहरात शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना बंदी असताना महापालिकेत मात्र गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. अखेर या गर्दीींवर नियंत्रण आणण्यात आले असून केवळ नियोजित वेळ घेतलेल्या नागरिकांनाच पालिकेत प्रवेश दिला जात आहे. तसेच पालिकेत येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेशद्वारावरच रोखण्यात येत आहे.

महापालिकेत होणाऱ्या अनावश्यक गर्दीमुळे पालिका इमारत कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पालिकेकडून मुख्य इमारतीत प्रवेशाचे निबंध अधिक कडक करण्यात आले आहे याशिवाय, कामा शिवाय महापालिकेत येण्यास मनाई करण्यात आली असून केवळ पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या नागरिकांनाच आत सोडले जात आहे.

तरी देखील महापालिकेच्या ओळखीच्या कर्मचाऱ्याला बाहेर बोलवून तसेच राजकीय नेत्यांच्या नावाखाली अनेक जण महापालिकेत गर्दी करत आहेत. त्या ठेकेदारांचा तसेच कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे काही विभागात अनावश्यक गर्दी होत असून करोनाचा प्रसार महापालिकेतूनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.