Pune News : वारजे परिसरातील रसिक नागरिकांनी घेतला भक्तिसंध्या कार्यक्रमाचा आस्वाद

एमपीसी न्यूज – वारजे हायवे परिसर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच आषाढी एकादशी निमित्ताने “अगा वैकुंठीच्या राया” या भक्तिसंध्या कार्यक्रमास वारजे परिसरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ आणि विरोधी पक्षनेत्या तथा नगरसेविका दीपाली धुमाळ यांची विशेष उपस्थिती होती.

“अगा वैकुंठीच्या राया ” -सुरेल भक्तीसंध्या
वारजे येथील वारजे हायवे परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त “लीड फ्रॉम फ्रंट “चा आदर्श ठेवणारे, खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक असलेले प्रदीप उर्फ बाबा धुमाळ व विरोधी पक्षनेत्या नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्यातर्फे वारजे हायवे परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिना निमित्ताने आषाढी एकादशीच्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका डॉ. अनघा राजवाडे प्रस्तुत “अगा वैकुंठीच्या राया “या भक्ती गीतांच्या ऑनलाईन फेसबुक लाईव्ह कार्यक्रमास जगभरातील रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

‘जय जय रामकृष्ण हरी ‘या विठ्ठल गजराने कार्येक्रमाची सुरवात करण्यात आली.कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात आनंदी, सकारात्मक भाव भावनांचे वर्णन करणाऱ्या गीतांनी रसिक श्रोते भारावून गेले. अनाघाताईंनी व श्री अमोल मोरे यांनी ‘टाळ बोलें चिपळीला ‘, आली कुठूनशी कानी ‘,येई ओ विठ्ठले ‘, ‘सावळ्या विठ्ठला ‘, ‘विठू माझा लेकुरवाळा ‘, “अरे कृष्णा अरे कान्हा “, “साईराम साईश्याम “, ‘मन लागो रे लागो रे गुरुभजनी ‘, ‘अवघे गरजे पंढरपूर ‘, “बाजे रे मुरलिया “, अशा अजरामर विठ्ठल गीतांची जणू रसिकांना पर्वणीच दिली.

“अवघा रंग एक झाला “या भैरवीने मैफिलीची सांगता करण्यात आली. प्रदीप व  दीपाली धुमाळ यांनी उत्तम संयोजन केल व ऑनलाईन श्रोत्यांचे आभार मानले. अशोक मोरे, अमोल मोरे, गीतांजली मोरे यांनी सुयोग्य साथसंगत केली. संघाचे अध्यक्ष नंदकुमार बोधाई यांनी प्रास्ताविक केले तर दातार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.