Pune News : शहर भाजपचे ‘जोडे मारा आंदोलन; आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक

एमपीसी न्यूज – मदतीची याचना करणाऱ्या चिपळूणमधील पूरग्रस्त महिलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आरेरावीची भाषा करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांचा निषेध करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकात आज ‘जोडे मारा’ आंदोलन केले.

यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, भास्कर जाधव यांनी केलेले वर्तन सत्तेची मस्ती आणि गुंडगिरीचे प्रदर्शन करणारे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठीशी घालून मोठी चूक केली आहे. जनता योग्य वेळी याचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. या अपप्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

मुळीक पुढे म्हणाले, ‘महापुरामुळे कोकणातील सामान्य माणसाची खूप मोठी वित्त हानी झाली आहे. घर-संसार-व्यवसायाचे मोठे नुकसान झाल आहे. अशा वेळी नागरिक सरकारकडे मायबाप नात्याने मदतीची विनंती करत असताना सरकारमधील आमदार त्याची कुचेष्टा करतात. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या कृत्याचा आज आम्ही जोडे मारून निषेध केला.’

शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, सुशील मेंगडे यांच्यासह मतदारसंघांचे अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.