Pune News : येत्या सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू !

एमपीसी न्यूज : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून ( दि. २३ ) सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार स्थानिक महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने व्यवस्था करावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाकडून गेल्या दिल्या आहेत.

राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्याची तयारी सध्या सुरू आहे. शाळा सुरू करण्यापूर्वीची तयारी म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भात स्थानिक प्रशासनाला विविध सूचनाही देण्यात येत आहेत.

राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने काढलेले परिपत्रक आणि मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक प्रशासनाने शाळा, शिक्षक यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालये यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

शाळांना सँनिटायझर, थर्मल गन, ऑक्सीमीटर अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे.

तसेच येत्या रविवारपर्यंत ( दि. 22) संबंधित शिक्षकांना शासकीय केंद्रात कोविड-19 साठी आरटीपीसीआर टेस्टिंग मोफत वैद्यकिय तपासणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.