Pune : भाऊसाहेब रंगारी शिवगर्जना मित्र मंडळातर्फे स्वच्छतेचे अभियान

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कर्वेनगर येथील भाऊसाहेब रंगारी शिवगर्जना मित्र मंडळातर्फे वनदेवी टेकडी कर्वेनगर ( Pune ) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक टेकडीवर बरेच नागरिक मद्यपान करतात व कचरा पसरवतात याबाबत ही स्वच्छता मोहीम होती.

 

PCMC : महापालिकेच्या 88 इमारतींना  नोटीसा

अध्यक्ष सुरज मोहिते, उपाध्यक्ष माही दळवी, कार्याध्यक्ष बालाजी पवार, उपकार्याध्यक्ष अभिजीत मोरे, शिवाजी कडू ,कल्याणी हाटकर, लहू वांजळे ,दिलीप वाकडे ,विठ्ठल पिसाळ,  दत्ता भोसले या मंडळाच्या सर्व पदाधिकारी व  हितचिंतकांच्या उपस्थितीत हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम पार पडला.

शिवगर्जना मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या या स्वच्छता अभियानामुळे बराच कचरा साफ झाला व वनदेवी टेकडी स्वच्छ झाली. अशा या नैसर्गिक टेकडीवर कचरा करू नये व मद्यपान करू नये असा संदेश ( Pune ) यावेळी देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.