Pune News : स्पष्ट बहुमतामुळे सरकारला कुठलाच धोका नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुनरुच्चार

0

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडी सरकार काही महिन्यांनी पडणार असे विरोधक म्हणत होते. दर तीन महिन्यांची मुदत ते देत होते पण सव्वा वर्षे सरकार स्थिर आहे. स्पष्ट बहुमतामुळे सरकारला कुठलाच धोका नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

_MPC_DIR_MPU_II

पुणे पोलीस मुख्यालयात कार्यक्रमानंतर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आम्ही घाबरत नाही. तसं काही असतं तर आम्ही राजीनामाच घेऊ दिला नसता. 170 आमदारांचं पाठबळ आहे. आम्ही एकत्र अधिवेशनाला सामोरे जाणार आहोत. एखाद्या बिलावर गुप्त मतदान झालं तर मतदान कमी झालं तर सरकार अल्पमतात जातं. परंतु सध्या तरी सरकारला कुठलाही धोका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल. पण विरोधक बरळत होते 3 महिने, 6 महिने 9 महिने 12 महिन्यात सरकार पडेल. तीन महिन्यांची मुदत ते देत असतात, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment