Pune News : प्लाझ्मा दानासाठी पुढे या – पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी केले आहे.

कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे मो.नं.9960530329 या व्हॉटस्अपवर मेसेजव्दारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी.

पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे यांनी हे चांगले व्यासपीठ तयार केले आहे. बोलणारे भरपूर बोलतात पण आपण सर्व प्लाझ्मादान करणाऱ्यांनी जे काही करुन दाखविले याचा मला आनंद आहे. पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे.

ज्यांना ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना ते देण्यासाठीच आपण हा उपक्रम राबवत आहोत, असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले.

प्लाझ्मा दाता अभिजित पाटणकर आपला अनुभव सांगताना म्हणाले, पुणे पोलीस अतिशय उत्तम उपक्रम राबवत असून ज्यांना प्लाझ्मा दान करायचा आहे व ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांनी पुणे पोलिसांना संपर्क साधावा.

तसेच, कोरोनातून बरे झालेल्या व उपचाराला 28 दिवस पूर्ण झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे असे आवाहन पाटणकर यांनी केले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.