Pune News : दिलासादायक! गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांची संख्या 50 हजारांहून 14 हजारांवर!

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाचा प्रसार कमी होत असून गेल्या आठवडाभरात सक्रिय रुग्णामध्ये मोठी घट झाली असून गृह विलगीकरणामध्ये असणारे रुग्ण तब्बल 15 हजार रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 14918 रुग्ण गृह विलीगिकरणात आहेत. परंतु, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडवर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या मात्र, दहा हजारांच्या घरात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजराच्या वर गेली होती. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुसज्जता निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. बेडची संख्या 14 हजारांच्यावर नेण्यात पालिका प्रशासनाला यश आले. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने प्रशासनदेखील हतबल झाले होते. सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेल्यामुळे या चिंतेमुळे अधिकच भर पडली होती.

मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य शासनापाठोपाठ पालिकेनेही 15 एप्रिलपासून शहरात संचारबंदी लागू केली असून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या उपाययोजनांचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्याही कमी होत चालली आहे. सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा खाली आला असला तरी गृह विलगीकरणामधील रुग्णांचा आकडा सर्वाधिक कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परंतु, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्ण, पालिकेचे रुग्णालय आणि केअर सेंटरमधील रुग्णालय यातील रुग्णांची संख्या दहा हजारांच्या घरात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.