Pune News : आर्थिक अपव्यय रोखण्यासाठी आयुक्त करणार मोठ्या प्रकल्पांचे एस्टिमेट !

एमपीसी न्यूज : महपालिकेच्या मोठ्या प्रकल्पांच्या एस्टीमेटमध्ये होणारा फुगवटा तसेच वाढीव खर्च आणि कालावधी यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. हा ‘आर्थिक अपव्यय’ रोखण्यासाठी खुद्द महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 25 कोटी रुपयांवरील सर्व कामांचे एस्टीमेट स्वतंत्र कमिटीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे.

दीर्घकालिन चालणार्‍या आणि कोट्यवधीचा खर्च असलेल्या प्रकल्पांचे एस्टीमेट आणि प्रत्यक्ष काम पूर्ण होताना झालेला खर्चामुळे अंदाजपत्रकावर बोजा पडत जातो. राज्य सरकार आणि महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या ऑडीटमध्ये या बाबी वेळोवेळी उघडही झाल्या आहे.

त्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 3 कोटी रुपयांपुढील कामांच्या एस्टीमेट कमिटीचे अध्यक्षपद हे संबधित विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांकडे होते. आयुक्तांनी केलेल्या नवीन रचनेनुसार अतिरिक्त आयुक्तांकडे 3 ते 25 कोटी रुपयांपर्यंतच्या कामांच्या एस्टीमेट कमिटीचे अध्यक्षपद राहणार आहे.

नजीकच्या काळातील 25 कोटी रुपयांवरील जायका कंपनीच्या सहकार्यातून राबविण्यात येणारा नदी सुधार प्रकल्प, एचसीएमटीआर प्रकल्प, बाल गंधर्व रंगमंदिर पुनर्निमाण, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडीकल कॉलेज आणि रुग्णालय या प्रकल्पांचे एस्टीमेट तयार करण्यासाठीच्या कमिटीचे अध्यक्षपद महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे भुषविणार आहेत.

तर शहर अभियंता 1 ते 3 कोटी रुपये, खातेप्रमुख 50 लाख ते 1 कोटी रुपये, कार्यकारी अभियंता 10 लाख ते 50 लाख रुपये आणि उपअभियंत्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कामाचे एस्टीमेट तयार करण्याचा अधिकार राहाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.