Pune News : कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाकडेवाडीतील कंपनीला 87 हजाराचा दंड

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेने घालून दिलेल्या covid-19 नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाकडेवाडी येथील एका कंपनीला सफल 87 हजार रुपयांचा दंड पाठवण्यात आला. या कंपनीत तब्बल 87 कर्मचारी सोशल डिस्टंस नियमाचे पालन न करता काम करताना आढळून आली होती. शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त आशा राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज ( 9 एप्रिल) 2021 वाकडेवाडी येथील कॅलिबर बिझनेस सपोर्ट सव्हिसेस प्रा.लि या कंपनीत पाहणी केली असता कंपनीतील 67 कर्मचारी काम करत होती. या कार्यालयात सामाजिक अंतर पाळल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे या कंपनीला 87 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. तसेच यानंतर नियम न पाळल्यास कंपनी सील केले जाईल अशी ताकीद देण्यात आली आहे.

महापालिकाने आखून दिलेल्या नियमानुसार आस्थापना चालू ठेवाव्यात अन्यथा कोविड प्रतिंबधासाठी अजून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सह. आयुक्त आशा राऊत यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.