Pune News : वाढीव बिल आकारल्या प्रकरणी 222 रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी, 172 रुग्णालयांना नोटिसा

0

एमपीसी न्यूज – कोरोना उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक बिले आकारल्या प्रकरणी महापालिकेने 172 रुग्णालयांना वाढीव बिलप्रकरणी नोटीसा पाठवल्या आहेत.

काेराेनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयांकडून वाढीव दराने बिल आकारणी केली जात हाेती. त्यावेळी राज्य सरकारने उपचाराच्या खर्चाबाबतची नियमावली जाहीर केली हाेती. या नियमावलीनुसारच बिलांची आकारणी करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या बिलांची तपासणी करण्याचे काम महापािलकेकडून केले जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्या नंतर आता वाढीव बिलांचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेकडे तक्रारी आणि रोज सुमारे 25 अर्ज ऑडिटसाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे मार्च पासून आकारलेल्या बिलांचे ऑडिट करण्यात येणार आहे.

वाढीव बिल आकारल्याप्रकरणी 222 रुग्णालयांच्या तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत 172 खासगी रुग्णालयांना नोटीसा दिल्या असून, त्यापैकी 90 निकाली काढल्या आहेत. 27 बिलांचे लेखापरीक्षण करून त्यांचे 20 लाख रुपये परत दिले आहेत. तर 15 जणांचा संपर्क होत नाही तसेच काहींमध्ये तथ्य आढळले नाही, अशी माहिती डॉ. नाईक यांनी दिली.

पालिकेच्या नंबरवर कॉल करून करा तक्रार
कोविडच्या साधारण बेडसाठी प्रतिदिन 4 हजार, ऑक्सिजन बेडसाठी साडेसात हजार आणि व्हेंटिलेटर बेडसाठी 9 हजार अशी बिल आकारण्याची मर्यादा राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना ठरवून दिलेली आहे. यापेक्षा दरदिवशी जास्त बिल आकारल्यास रुग्णांनी पालिकेच्या  020 – 25502115 या क्रमांकावरही तक्रार करावी. याशिवाय शहरातील ३० मोठया रुग्णालयांत बिलांचे जागेवरच लेखापरिक्षण करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment