Pune News : डॉक्टरांसाठीचे राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य वेबिनार संपन्न

एमपीसी न्यूज : करोना विरुद्ध लढाईतील आघाडीचे योद्धे म्हणून अनेक वेळा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर मानसिक आणि शारीरिक ताण येतो. त्यावर मार्गदर्शनासाठी ‘जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’ (जीपीए) आणि ‘हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते.

या वेबिनारमध्ये ‘नकारात्मकता ते सकारात्मकता’ या विषयावर डॉ. अनुराग कटियार (लखनऊ) यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘स्थितिस्थापकत्वामुळे आंतरिक आनंद’ विषयावर डॉ. अलोक मुळीक (हैदराबाद) यांनी तर ‘सकारात्मक उपचार’ विषयावर डॉ.कल्पना महाबळेश (कर्नाटक) यांची मार्गदर्शन केले. यामध्ये ७५ ते ८० डॉक्टर्स सहभागी झाले होते.

हृदय रोग तज्ञ डॉ सचिन लकडे यांच्या हस्ते दिप प्रज्ज्वलन करून वेबिनारची सुरवात झाली. यावेळी आयोजक जीपीए अध्यक्षा डॉ. रूपा अग्रवाल, सचिव डॉ.संतोष खेडकर व डॉ.सुनिल भुजबळ उपस्थित होते. डॉ.श्रीराम जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

या उपक्रमाचे संयोजन डॉ.कुशल महाजन आणि डॉ.मनिष कुलकर्णी यांनी केले होते. डॉ. भाग्यश्री मुनोत आणि डॉ.राजेश बर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.