Pune News : महापालिकेच्या मुख्य सभेत पुन्हा गोंधळ पुन्हा तहकुबी !

राष्ट्रगीत लावून विरोधकांचा आवाज दाबण्याची नवी प्रथा

एमपीसी न्यूज : एकही विषयावर चर्चा न होता आजची महापालिकेची मुख्य सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भातील तहकुबीचा प्रस्ताव मांडताना राष्ट्रगीत लावून आवाज दाबण्याची नवी प्रथा सुरू करण्यात आली.

पर्यावरण अहवाल पटलावर सादर करण्यासंदर्भातील मुख्य सभा नामवंत व्यक्तींच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली.

दरम्यान काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्र व्यवहारामध्ये अनावश्यक बाबींचा उहापोह होता. ही बाब घटनेची पायमल्ली करणारी आहे. मा.राज्यपालांनी घटनेची प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची व्यथा व्यक्त करून आजची सभा तहकूब करावी अशी मागणी केली.

परंतु तहकुबीची उपसूचना मांडत असताना अचानक राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ झाला. तहकुबी स्वीकारली का फेटाळली, अशी विचारणा उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना नगरसेवकांकडून करण्यात आली, परंतु त्यावर काहीही न बोलता उपमहापौरांनी सभागृह सोडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.