Pune News: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्या काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज – केंद्रातील भाजप सरकारचे शेतकरी व कामगार विरोधी केलेले काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उद्या (दि. 2 ऑक्टोबर) सकाळी 9.30 वा. आंदोलन करण्यात येणार आहे. कै. आण्णासाहेब मगर पुतळा, गुलटेकडी मार्केटयार्ड येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे.

भाजप सरकारने शेतकरी व कामगार कायदे केल्यानंतर त्या विरोधात काँग्रेस संबंध देशभरात आक्रमक झाली आहे. राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे शेतकरी विधेयक मंजूर होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शेतकरी विधेयक लागू होणार नसल्याचे पुण्यात निक्षून सांगितले होते. भाजपने घाईघाईने शेतकरी विधेयक मंजू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण उद्या काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.