Pune News: राजस्थानात काँग्रेसचे सरकार स्थिर, राहुल गांधी, प्रियंका यांच्या अभिनंदनाचा ठराव

एमपीसी न्यूज – राजस्थानात काँग्रेसचे सरकार स्थिर राहिले. सचिन पायलट यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. त्यासाठी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी मंजूर करण्यात आला.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आजी – माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वरील ठराव मंजूर करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी त्याला अनुमोदन दिले.

कर्नाटकातील भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकला म्हणून त्या सरकारचा निषेधाचा ठराव शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मांडला. त्याला माजी आमदार दीप्ती चवधरी यांनी अनुमोदन दिले.
यावेळी रोहित टिळक, अरविंद शिंदे, दत्ता बहिरट, रवींद्र धंगेकर, संजय बालगुडे, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, नीता रजपुत, वीरेंद्र किराड, राजेंद्र शिरसाट उपस्थित होते.
पुणे शहरातील वॉर्ड रचना कशी असावी, या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी एक समिती गठित करण्यात येणार आहे. त्या समितीच्या प्रमुख म्हणून माजी महापौर कमल व्यवहारे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर अजून 4 ते 5 अनुभवी नगरसेवक आणि अनुभवी नेते मंडळी असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.