Pune News : बऱ्याच वर्षांनंतर महापालिकेमध्ये काँग्रेसची बैठक

एमपीसी न्यूज – बऱ्याच वर्षांनंतर काँग्रेसच्या नगरसेवककांची सोमवारी (दि. 21 सप्टेंबर) हापालिकेत बैठक झाली. सप्टेंबर 2020 च्या कार्यपत्रिकेवर चर्चा करण्यासाठी पक्ष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कार्यपत्रिकेवर चर्चा होऊन शहराच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली.

असून यावेळी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रामेश बागवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस पक्षाचे पुणे महानगरपालिकेचे गटनेते आबा बागुल, नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धांगेकर, अविनाश बागवे, नगरसेवक रफिक शेख, नगरसेविका सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, चाँदबी नदाफ, स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर आदी उपस्थित होते.

 बऱ्याच वर्षानंतर महापालिका काँग्रेस पक्षाची बैठक सोमवारी  गटनेते आबा बागुल यांच्या दालनात झाली. पुणेकरांपुढील असलेले प्रश्न, महापालिकेचा कारभार यावर बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली, असे आबा बागुल यांनी सांगितले.

महापालिकेचा कारभार, सभांपुढील कार्यपत्रिका यावर पक्षाची बैठक घेऊन निर्णय आखणे, व्यूहरचना ठरविणे अशी पद्धत माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी अवलंबिली होती तीच पद्धत आबा बागुल यांनी पुन्हा चालू केली आहे. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

पुणेकरांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, त्यासाठी आवाज उठविण्याचे आदेश रमेश बागवे यांनी नगरसेवकांना दिले आहेत. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.