Pune News : काँग्रेस आमदार व विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ  काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शरद रणपिसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. नंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. मागील पाच दिवसापासून व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते मात्र आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

उद्या सकाळी 9 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. अंत्यविधी कोरेगाव पार्क येथील स्मशाभूमीत होणार आहे.

कोण होते शरद रणपिसे?
शरद रणपिसे यांचा जन्म 18 सप्टेंबर 1951 रोजी पुण्यात झाला होता. पुण्यातच त्यांचं बालपण गेलं. महाविद्यालयीन शिक्षण देखील त्यांनी पुण्यनगरीतच घेतलं. पुढे महाविद्यालयीन जीवनातच त्यांना राजकारणाचे वेध लागले. पुढे काही काळातच त्यांनी राजकारणात सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.