Pune News : काँग्रेसला आता विटी दांडू खेळण्याशिवाय दुसरा काही उद्योगच नाही – पुष्कर तुळजापूरकर 

एमपीसी न्यूज – ‘पुणे शहर हे वेगाने विकास करणारे शहर झालं आहे भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असल्याने तसेच भाजपच्या नगरसेवकांचे काम चांगले असल्याने आता काँग्रेसकडे टीका करण्यासाठी कुठलेच मुद्दे उरलेले नाहीत तसेच राज्यातील काँग्रेसची अवस्था सुद्धा सत्तेत असून नसल्या सारखीच आहे त्यामुळे आता काहीच काम नसल्याने त्यांना वेळ घालविण्यासाठी विटी दांडू, गोट्या खेळणे अशा पक्षांतर्गत स्पर्धा भरविण्याची इच्छा झालेली दिसते त्यामुळेच सरावासाठी आज रस्त्यावर विटी दांडू खेळत असावे’ असा टोला भाजपचे शहर सहप्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांनी लगावला.

काँग्रेस ने शहराची 15 वर्षात केलेली बकाल अवस्था आता कुठे सुधारू लागली आहे त्यातसुद्धा शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू झाली आहे ही चांगली कामे होत असताना इतके वर्ष शहराची वाट लावणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पोटात कळ येणे स्वाभाविक आहे.

पण भारतीय जनता पक्ष ही सामान्यांच्या प्रश्नावर काम करणारा पक्ष आहे सामन्यांचे जीवन सुखवाह व्हावे, यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कटिबद्ध आहोत, असे त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.