Pune News : कचरा संकलनांसाठी ठेकेदारीचा घाट ; ‘स्वच्छ’ संस्थेचे काम थांबविणार

0

एमपीसी न्यूज : शहरातील कचरा संकलन, ओला सुका वर्गीकरण आणि वितरणासाठी नवी ठेकेदारांची नेमणूक करण्याच्या निविदा काढण्याचा घाट घालण्यात आला आहे. काही राजकीय पक्षांच्या मूठभर नेत्यांच्या आट्टाहासापायी खासगीकरण केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अन्य खासगी कंपनीकडून कचऱ्यासाठी पुणेकरांना जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहर, उपनगरांत घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासोबतच त्याच्या वर्गीकरणाच्या कामाची जबाबदारी असलेल्या ‘स्वच्छ’ संस्थेची मुदत संपल्याने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

मात्र, ही मुदत संपल्यानंतर नवे ठेकेदार नेमण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया आता सुरु करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी आज स्पष्ट केले.

घरगुती, औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणारा कचरा रोजच्या रोज संकलन करून त्यातील ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी प्रत्येक घरमालकांकडून महिन्याकाठी 50 रुपये आणि व्यावसायिकांकडून किमान 100 रुपये घेण्यास महापालिकेची परवानगी आहे.

महापालिका प्रशासनाचा स्वच्छ संस्थेसोबत करारही झाला आहे. मात्र, करार संपल्याने ‘स्वच्छ’ऐवजी अन्य नामांकित कंपन्यांना कामे देण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे.

त्यातून विविध भागांतील कचरा संकलनाच्या कामासाठी ठेकेदार नेमून, कचऱ्यावरील प्रक्रियेचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत.

पुण्यातील कचरा संकलनाची सद्य:स्थिती 

‘स्वच्छ’च्या माध्यमातून संकलित होणारा कचरा : 8 लाख लाख 50 हजार मिळकती (निवासी, व्यावसायिक)
– प्रत्येक घरांसाठी दर : निवासी 70 रुपये
– व्यावसायिक : 140 रुपये
-कचरा गोळा करणारे स्वच्छचे कर्मचारी : 3,500
-महापालिकेकडून “स्वच्छ’ला मिळणारे निधी : चार कोटी रुपये (वार्षिक)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.