Pune News पुण्यात कोरोना कॉल सेंटर आता 24 तास; बेड्सची उपलब्धता जाणून घेण्यास मदत होणार

हेल्पलाईन क्रमांकाची संख्या दुप्पट

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्ग वाढत असताना रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळाली यासाठी कॉल सेंटरचे विस्तारीकरण केले असून आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती 24 तास मिळणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होणे सोपे व्हावे, या अनुषंगाने कोरोना कॉल सेंटरचा आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या भेटीवेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना कॉल सेंटर 24 तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन यातील हेल्पलाईन क्रमांकाची संख्या दुप्पट केली जात आहे. यात आधी 5 हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध होते, ते आता दहापर्यंत वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे कॉल कनेक्ट होण्यास अडचण निर्माण होणार नाही’, असेही मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.