Pune News : महापालिका शाळांमधील शिक्षकांना करोना नियंत्रणाचे काम, शिक्षकांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज –  महापालिकेच्या शाळांमधील सुमारे साडेतीनशे शिक्षकांना पुन्हा करोना नियंत्रणाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. जुलै महिन्यात या शिक्षकांना शैक्षणिक अध्यापनाच्या कामासाठी मुक्त करण्यात आले होते.

पालिकेने पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना कोरोना नियंत्रणाच्या कामातून कार्यमुक्त  केले असून त्यांच्याकडे असलेले करोना नियंत्रणाचे काम पुन्हा पालिकेच्या शिक्षकांकडे देण्यात आले आहे.

त्यामुळे या शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच शहरात कोणतेही करोना संरक्षण नसताना आणि दैनंदिन रुग्णसंख्या दोनशेपेक्षाही कमी असताना पुन्हा करोना ड्युटी का? असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच तातडीने हा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरात करोनाची दुसरी लाट पूर्णतः ओसरली असून गेल्या तीन महिन्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्या घटली आहे. शहरात केवळ संशयित रुग्णांचीच चाचणी केली जात असून जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे तसेच लसीकरणासह इतर कामे केली केली जात आहेत.

या कामांसाठी जुलै महिन्यात कार्यरत असलेले शिक्षक शैक्षणिक अध्यापनाच्या कामासाठी मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, पालिका प्रशासनाकडून या कामाची जबाबदारी पीएमपीएमएलच्या 750 कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.