Pune News : पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग

एमपीसी न्यूज – पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झाला आहे, यापूर्वी कोरोनावरील पहिला डोस घेतल्यानंतरही ते कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी लसीचा दुसरा डोसही घेतला होता.

दोन महिन्यांमध्ये दोनवेळा राव यांना करोनाने गाठले आहे. सौरभ राव यांना दोन दिवस ताप आल्यामुळे त्यांनी चाचणी करून घेतली. सोमवारी सायंकाळी त्यांची चाचणी ही पॉझिटिव्ह आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

मागील शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौन्सिल हॉल येथे कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्या बैठकीला सौरभ राव उपस्थित होते. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यापासून गेल्या सुमारे 20 दिवसांपासून ते प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या कार्यालयातून नियोजन करत असल्याने परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली आहे.

आता सौरभ राव यांना पुन्हा कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन लगेचच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.