_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : कोरोना रुग्णांना आता ’म्युकरमायकोसिस’ चा धोका; तात्काळ उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

एमपीसी न्यूज – कोरोनाशी दोन हात करून घरी परतणाऱ्या रुग्णांना आता आता म्युकरमायकोसिसचा देखील धोका आहे. रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास अंधत्व येते. तसेच प्रकरण गंभीर झाल्यास रुग्ण दगावत देखील आहेत, अशी माहिती कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ. महेश लाखे यांनी दिली.

महाराष्ट्र व गुजरातमध्ये या आजाराचे शेकडो रुग्ण सापडत आहेत. तर अनेक जण मृत्यूमुखी देखील पडले आहेत. म्युकरमायकोसिसचा हा संसर्ग म्युकरमायकोसिटस या बुरशी गटामुळे होतो. संपूर्ण वातावरणात, विशेषत: माती, पाने, कंपोस्ट ब्लॉक व जनावरांच्या शेणामध्ये ही बुरशी उपस्थित असते. ती हवेपेक्षा मातीत आणि हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात अधिक सामान्य असते. बरेच लोक दररोज सूक्ष्म बुरशीजन्य बीजाणूंच्या संपर्कात येतात. त्यामुळेच म्युकरमायकोसिटसशी पूर्ण संपर्क टाळणे अशक्य आहे.

या बुरशी बहुतेक लोकांना हानिकारक नसतात. तथापि, ज्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. अशा लोकांच्या श्वासाद्वारे त्यांचा फुफ्फुसात किंवा सायनसमध्ये यामुळे संसर्ग होऊ शकतो. जो शरीराच्या इतर भागात पसरू शकतो. कोविड १९ च्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यामुळेच हा आजार त्यांच्यामध्ये अधिक झपाट्याने फोफावत आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोविड -19 व म्युकरमायकोसिस मधील परस्परसंबंध अज्ञात आहेत. मात्र कोविड -19 मध्ये होणारी फुफ्फुसांची जळजळ कमी करण्यासाठी स्टिरॉइड्स वापरले जाते. कोरोना रुग्णांवर स्टिरॉइड्सचा अनियंत्रित वापर धोक्याचा असतो. ज्यामुळे काही प्रमाणात नुकसान होते. तसेच त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. कोविड -19 मध्ये मधुमेह असलेल्या व नसलेल्या या दोन्ही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे, ज्यांनी स्टिरॉइड्स घेतले आहे किंवा दीर्घकाळ आयसीयू होते अशा रुग्णांमध्ये ही स्थिती विकसित होण्याची अधिक शक्यता असते, असे संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ. अरुण सुराडकर यांनी सांगितले.

शासनाने (आयसीएमआर) ने म्युकरमायकोसिसची तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये स्टिरॉइडचा योग्य वापर करा. ऑक्सिजन थेरपी दरम्यान ह्युमिडिफायर्ससाठी स्वच्छ व डिस्टिल्ड वॉटर वापरा. रुग्णांमध्ये हायपरग्लाइसीमिया नियंत्रित करा. कोविड 19 चा रुग्ण बरा झाल्यानंतर रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण तपासा. मधुमेह रुग्णांचे काटेकोर निरीक्षण करा. अशा प्रकरणांवर योग्य उपचार करण्यासाठी मायक्रोबायोलॉजिस्ट, अंतर्गत औषध / संसर्गजन्य रोग विशेषज्ञ, इंटिव्हिव्हिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, ईएनटी, नेत्ररोग तज्ञ, दंतचिकित्सक शल्य चिकित्सक (मॅक्सिलोफेसियल / प्लास्टिक) आणि बायोकेमिस्ट यांची विशेष पथके तयार करा.

आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. विशेषत: इम्यूनोप्रेशरन किंवा इम्यूनोमोड्यूलेटरवरील कोविड -19 रुग्णांच्या संदर्भात विशेष काळजी घ्या. बुरशीजन्य एटिओलॉजी शोधण्यासाठी अजिबात संकोच करू नका. तात्काळ आवश्यक निदान करुन घ्या. म्युकरमायकोसिस वरील उपचार सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण वेळ गमावू नका, असे आवाहन डॉ. महेश लाखे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.