Pune News: कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण तब्बल 13 टक्क्यांनी वाढले- सौरभ राव

कोरोनाचा मृत्युदरही 0.97 टक्क्यांनी कमी झाला असून पुण्यातील कोरोनाचा आलेख कमी होत आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या आजारातून बरे होण्याचे प्रमाण मागील एक महिन्यात शहरासह जिल्ह्यात 13 टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

कोरोनाचा मृत्युदरही 0.97 टक्क्यांनी कमी झाला असून पुण्यातील कोरोनाचा आलेख कमी होत आहे. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात पुण्यातील कोरोना आजाराची परिस्थिती गंभीर होती. दैनंदिन चाचण्या, रुग्ण शोधणे, वेळेत उपचार यांमुळे कोरोनाचा आलेख कमी होत आला आहे.

दि. 26 जुलै रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64 टक्के होते. आता हे प्रमाण 77 टक्के आहे. मृत्युदर 3.1 वरून 2.04 टक्के एवढा कमी झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मृत्युदर 2.7 टक्के होता. 18 ते 24 ऑगस्ट कालावधीत 25 हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 6400 रुग्ण सापडले. हे प्रमाण 25 टक्के एवढे होते.

मृत्युदर दोन टक्के एवढा होता. तर, पुणे महापालिका हद्दीत 11 ते 18 ऑगस्ट या कालावधीत 39 हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 22 टक्के रुग्ण सापडले. मृत्युदर 2.7 टक्के होता. तर, 18 ते 26 या कालावधीत शहरात 44 हजार चाचण्या घेण्यात आल्या.

21.15 टक्के रुग्ण सापडले. मृत्युदर 2.5 टक्के होता. आता पुणे शहरात कोरोना आटोक्यात असल्याचे सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.