Pune News : मरणाच्या दारात टेकलेल्यांना देखील विचारला जातोय कोरोना अहवाल

अहवाल नसेल तर उपचारास नकार , अहवाल येण्यास लागतायत 3 ते 4 दिवस

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना टेस्ट केल्यानंतर अहवाल येण्यास ३ ते ४ दिवस लागत आहेत. यादरम्यान जर रुग्णाला त्रास झाला तर पुण्यातील शासकीय रुग्णालयांसह प्रमुख खासगी रुग्णालयांकडूनही रुग्णांकडे कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल असेल तरच बेड मिळेल असे सांगितले जात आहे . त्यामुळे रुग्ण मरणाच्या दरात पोहोचत आहेत.

शहरात एका बाजूला कोरोनाचे गंभीर रूग्ण वाढत असतानाच; रुग्णांचा शासकीय चाचणी केंद्रावरील अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे, अहवाल येण्यापूर्वी कोरोना झाला आहे का नाही हे तपासणीसाठी नागरिक सीटी स्कॅन करण्यावर भर देत असून त्यात करोनाचा विषाणु फुफ्फुसे निकामी करत असल्याचे दिसले तरी चाचणी अहवाल असल्याशिवाय अनेक रुग्णालये बेडच रुग्णास देत नसल्याने अनेक रुग्ण अचानक गंभीर होत आहे. परिणामी अशा रुग्णांना अहवाल येण्याची वाट पाहत उपचाराविनाच रहावे लागत आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात गेल्या आठवडयापासून नवीन बाधितांचा आकडा घटण्यास सुरुवात झाली असली तरी, गंभीर रुग्णांचे प्रमाण अचानक वाढले. मार्च महिन्याच्या अखेरीपासून शहरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण दिवसाला 20 हजारांच्या वर गेले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडयाच्या शेवटी दिवसाला तब्बल सरासरी 25 हजारांच्या पुढे करोना चाचण्या झालेल्या आहेत. त्यातच, रुग्णसंख्या कमी होत असली तरी, लक्षणे दिसताच अनेक जण भितीपोटी तातडीनं चाचणी केंद्र गाठत आहेत.

मात्र, महापालिकेकडून दिवसाला केवळ 2 हजार ते 2500 चाचण्या केल्या जात असून उर्वरीत चाचण्या खासगी लॅबमध्ये केल्या जात आहेत. त्यात, आता अनेक खासगी लॅबचे अहवाल 24 तासात येत असले तरी शासकीय केंद्रावरील चाचण्यांचे अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे या कालावधीत रुग्ण अहवालाची वाट बघत असून अनेकांना अचानक ऑक्‍सिजनची गरज भासत आहे. अशा वेळी हे रुग्ण डॉक्‍टरांच्या सल्ला घेऊन तातडीनं सीटी स्कॅन करून घेत आहेत. मात्र, त्यानंतरही त्यांना अहवालाची वाट पहावी लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.