Pune News : महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या विमान प्रवाशांना कोरोना अहवाल बंधनकारक नाही

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या विमान प्रवाशांना कोरोना अहवाल बंधनकारक नाही. दिल्ली विमानतळाच्या वतीने याबबात अधिकृत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यातून दिल्लीला जाणाऱ्या विमान प्रवाशांना निगेटिव्ह आरटीपीसीआर कोरोना अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक होते. नव्या नियमानुसार आता हा अहवाल बाळगणे बंधनकारक नाही.

एप्रिल महिन्यात लागू केलेल्या नियमावलीनुसार, महाराष्ट्रातून दिल्लीला प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना निगेटिव्ह आरटीपीसीआर कोरोना अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक होते. तसेच, 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागत होते. पण, आज (सोमवारी) दिल्ली विमानतळाच्या वतीने नवी नियमावली जाहीर करण्यात आली. या नियमावली नुसार आरटीपीसीआर कोरोना अहवाल सोबत बाळगणे गरजेचं नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.