Pune News : राज्यपालांकडून कोरोना वॉरियर्सचा सत्कार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात गरजूंना अन्न- धान्य, कामगारांना सुविधा व प्रवासी श्रमिकांच्या प्रवासाची व्यवस्था करणा-या मंथन फाउंडेशन आणि कुमाऊँ मित्र मंडळ यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार केला. 

राज्यपाल महोदयांनी सन्मानित केलेल्या कोरोना योद्ध्यांमध्ये मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, पुणे कुमाऊँ मित्र मंडळाचे अध्यक्ष पीसी. जोशी, अशोक भट्ट, योगेश कापड़ी, देवेंद्र सिंह ढेक, डॉ. गिरिजाशंकर मुंगली, चुंनीलाल शाह, आर. सी. पांडे, महेंद्र वालदिया, गढवाल भ्रातृ मंडळाचे ऋषि बिष्टट, रोहित बिष्ट यांचा सत्कार केला. याप्रसंगी जीवन खाती, दिवाण सिंह गोस्वामी आणि कमल घिल्डियाल मान्यवर उपस्थित होता.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कोरोना योद्ध्यांना राज भवनावर भेटीसाठी बोलावले होते. राज्यरपालानी त्यांचे कौतुक करत त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.