Pune News : कोरेगाव भीमा येथील महिला तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – सात बारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी तसेच जमीन वाटपाची नोंद करण्यासाठी 40 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले. शुक्रवारी (दि.12)ही कारवाई करण्यात आली.

संबंधित महिला तलाठी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे कार्यरत आहेत. अश्विनी दत्तात्रय कोकाटे ( वय 32, पद – तलाठी, सजा. कोरेगाव भीमा ) असे या महिला तलाठ्याचे नाव आहे. कोकाटे आणि निवृत्ती लक्ष्मण कानगुडे (वय 29) या दोघांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तलाठी अश्विनी कोकाटे यांनी तक्रारदाराकडे सात बारा उता-यावर नाव नोंदणीसाठी तसेच जमीन वाटपाची नोंद करण्यासाठी 40 हजारांची लाच मागितली.

त्यापैकी 20 हजार रुपये त्यांनी स्वतः तर 20 हजार निवृत्ती कानगुडे याने स्विकारले. लाचलुचपत विभागाने शुक्रवारी (दि.12) याबाबत पडताळणी करून त्याच दिवशी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.