Pune Crime : बंदुकीचा धाक दाखवून दांपत्यास लुटले 

एमपीसी न्यूज – बंदुकीचा धाक दाखवून दांपत्याला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर साताराकडून पुण्याच्या दिशेला कात्रज नवीन बोगद्यापासुन 500 मीटरच्या अंतरावर घडला.

याप्रकरणी चिन्मय देशमुख ( वय 32, रा. बिबवेवाडी, पुणे ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिन्मय देशमुख हे त्यांच्या पत्नीसह कारमधून कात्रज नवीन बोगद्यापासुन पुण्याच्या दिशेला जात असताना फिर्यादी हे लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात चोरट्यांनी देशमुख यांच्या पत्नीच्या पोटाला बंदुक लावली व त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.

चोरट्यांनी फिर्यादी देशमुख व त्यांची पत्नी यांच्या जवळील दोन सोन्याच्या अंगठ्या व मनगटी घडयाळ असा एकुण 1 लाख 20 हजार किंमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.