Pune News: बालेवाडी-बाणेर येथे कोविड हॉस्पिटल

Pune News: Covid Hospital at Balewadi-Baner या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला 100 बेड कार्यान्वित करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज – बालेवाडी येथील सर्व्हे क्र. 20, 21 आणि बाणेर येथील सर्व्हे क्र. 109 या मिळकतीमध्ये अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून सुमारे 4200 चौ.मी क्षेत्रफळाचा तळ मजला व 6 मजली इमारत ताब्यात येत आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने येथे सीएसआरच्या माध्यमातून पंचशील फाऊंडेशनतर्फे कोविड केअर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला 100 बेड कार्यान्वित करण्यात येणार आहे. येथील ऑक्सिजन बेड, आयसीयू बेडसह केटरिंग सर्व्हिसेस, फार्मसी सर्व्हिसेस, मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफ पुरविण्याचे काम भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांना कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव असेपर्यंत देण्यास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.